न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिनाभरातच आयुक्तालयांतर्गत ३९९ पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहायक फौजदारांचा त्यात समावेश आहे. वाहतूक शाखा, मुख्यालय ते विविध पोलीस ठाणे तसेच तपासी पथकात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या सोमवारी उशिरा करण्यात आल्या.
पुणे शहर व ग्रामीण पोलिसांचा काही भाग एकत्र करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालय कार्यान्वित झाले. आयुक्तालय नवीन असल्याने अनेक पोलिसांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. तर काही जणांनी आहे तेथेच ठाण मांडले. यात काही पोलीस प्रस्थापित असल्यासारखे होते. कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर रोजी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महिनाभरातच बदल्यांचे आदेश देत अशा प्रस्थापितांना झटका दिला. बदल्या झालेल्यांमध्ये सहायक फौजदार १३, पोलीस हवालदार १२२, पोलीस नाईक १५७, पोलीस शिपाई १०७ यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या सहायक फौजदारांची नावे
शिरीष कोंडाजी रसार ( भोसरी ते पिंपरी पोलीस ठाणे ) , हनुमंत बबन आवटे ( चिंचवड ते विशेष शाखा ) , अशोक ज्ञानेश्वर जाधव ( पिंपरी ते नियंत्रण कक्ष ) , बाबासाहेब दादासाहेब केदार ( भोसरी एमआयडीसी येथे सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ ) , राजेंद्र बाबासाहेब पवार ( भोसरी एमआयडीसी सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ ) , विष्णू शंकर माळी ( भोसरी एमआयडीसी सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ ) , संजय नारायण भालेराव ( सांगवी सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ ) , प्रकाश निवृत्ती नलगे ( सांगवी ते वाकड पोलीस ठाणे ) , नथूराम बबनराव शेवाळे ( देहूरोडला – सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ ) , मनोज पांडुरंग बनसोडे ( वाकड ते रावेत पोलीस चौकी ) , उत्तम नामदेव सांडभोर ( वाहतूक शाखा ते निगडी पोलीस ठाणे ) , शाकीर गौसमोहद्दीन जिनेडी ( मुख्यालय ते गुन्हे शाखा ) , चंद्रकांत सुलाभराव काटे ( दिघी ते पिंपरी चिंचवड अतिक्रमण निर्मूलन विभाग ).















