न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- शहरात तीन दुचाकी आणि एक टेम्पो चोरीला गेल्याच्या घटनांची विविध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अब्दुल शेख (वय ४५, रा. समतानगर, नवी सांगवी) यांची दुचाकी कस्पटे वस्ती वाकड येथील एका सोसायटीच्या वाहनतळातून चोरीस गेली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शितळादेवी चौक मामुर्डी येथून अडीच लाख रुपयांचा छोटा हत्ती टेम्पो चोरीस गेल्याची तक्रार हितेश घनश्यामसिंग चहार (वय २९, रा. शितळानगर, मामुडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली आहे. चिंचवड येथील शाहूनगरमधील आश्रय हाऊसिंग सोसायटोतून दुचाकी चोरीला गेली. सुमित दीपक उत्तेकर वय ३२, रा. आश्रय सोसायटी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दाविद देवशीष पहिलबान (वय २७, रा. जयभीमनगर, दापोडी) याची दुचाकी दापोडीतील टिकटॉक चायनीज येथून चोरीला गेल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. वाहन चोरीतील मास्टरमाइंड पोलिसांच्या हाती लागत नसल्याने वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.















