न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल निगडी पोलिसांनी पतीसह चौघांना अटक केली आहे. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. ३) रात्री घडली.
पती शुभम सतीश बगाडे (वय २१), सासरे सतीश ऊर्फ सत्यवान बगाडे (वय ४८), सासू सविता सतीश बगाडे (वय ३९), आजी सासू लीलाबाई अशोक ठोसर (वय ६०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत राजेंद्र अशोक ठोसर (वय ४०) आणि विजय अशोक ठोसर (३८, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. नव विवाहितेच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















