न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- आळंदी देवाची येथील इंद्रायणी नगर परिसरात सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संतोष विजय सुकाळे (वय १९, रा. इंद्रायणी नगर, आळंदी देवाची) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जुलै २०२६ ते ८ ऑगस्टदरम्यान आरोपीने पीडित सहा वर्षीय मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करीत आहेत.


















