न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- आपल्या मित्रासोबत पळून चाललेल्या भाची आणि तिच्या मित्राने मामाला पिकअप जिपचा धक्का देत जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजता गायकवाड वस्ती, मोशी येथे घडली.
शुभम शांताराम आतकरी (वय २२, रा. शिरोली, सुलतानपूर, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पळवून नेलेल्या तरुणीच्या बहिणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी आणि त्यांचे मामा गावी जाण्यासाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता निघाले होते. ते इमारतीच्या खाली आले असता फिर्यादी यांची बहीण पळत जाऊन आरोपीच्या जिपमध्ये बसली. फिर्यादी याना तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मामाने देखील पिकअपला अडवण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी यांच्या मामाला पिक अपचा धक्का लागून त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.















