न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- नाव आणि ई – मेलचा गैरवापर करून एकाने चार लाख ८० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. याबाबत सुरेश केशवदास सचदेव (वय ४९, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेच्या एका खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी खातेधारकाने अजय मोतीलाल रैना यांच्या नावाचा आणि ई – मेलचा गैरवापर करून ‘ आरटीजीएस ‘ द्वारे चार लाख ८० हजार रुपये आपल्या खाते क्रमांकावर पाठवण्यास फिर्यादी यांना सांगितले. हा प्रकार १० सप्टेंबर २०२० रोजी घडला आहे.















