न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- कोरोना महामारीच्या काळात काही प्रमाणात थंडावलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाईने जोर धरला आहे. कारवाई पुन्हा एकदा सुरु झाल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्र. ३२ मधील सांगवी परिसरात मंगळवारी (दि. २०) रोजी अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने कारवाई केली.
या कारवाईमध्ये साई चौक परिसरातील मनपा आरक्षित जागेवरील एकुण ४ पत्राशेड अंदाजे क्षेत्रफळ ४२०० चौ. फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून भुइसपाट करण्यात आले
ही कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ह’ प्रभाग यांचे पथकाने केली. यासाठी १ जे.सी.बी, तसेच ५ मजुर, १० मनपा अधिकारी व कर्मचारी, तसेच २१ मनपा पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.