- उन्नती सोशल फाऊंडेशनकडून खऱ्या कोरोना योद्ध्यांचा गौरव..
- ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने केले सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात समाजातील अनेक घटकांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व करोना काळात गरजूंना दररोज जेवणाचे डबे पुरविणारे रवि मुंढे, भारत लोहीया, मोहित अग्रवाल, उषा अग्रवाल, दिक्शा केजरीवाल, पाटील मॅडम, विजया काटे, पंकज देशमुख, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, ललित केरीवाल व अभिजित धारूनकार यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी संजय भिसे यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा होत्याचे नव्हते झाले होते. अनेक कामगार अन्न-पाण्यावाचून वंचित राहू लागले, तेव्हा रोज आयकाॅन सोसायटीतील २०० महीलांनी पिंपळे सौदागर ते रहाटणीमधील वंचितांना ३ महिन्यात २२ हजार जेवणाचे डबे पुरविले. त्यामुळे त्यांची जेवणाची भ्रांत मिटली. अशा कठीण काळात समाजाला अंतर न देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यथोचित गौरव केला पाहिजे. या हेतूने त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून इतरांसाठी झटणा-या व्यक्तीच खऱ्या योद्धा असतात. समाजाच्या भल्यासाठी त्या व्यक्ती अहोरात्र झटतात. त्यांना सन्मानित करून प्रोत्साहन देणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच अशा कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करते.
रोज आयकॅान सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे व सोसायटीतील सर्व सभासदांनी उन्नती फाउंडेशन व कुंदा भिसे यांचे आभार मानले.