न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृती मंडळाच्या तृतिय स्मृतीदिन सोहळ्यानिमित्त दोन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वर्षी ‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार’ जेष्ठ दुर्ग अभ्यासक आप्पा परब (मुंबई) यांना देण्यात आला तर ‘दुर्गमहर्षी क्रांतीपाईक पुरस्कार’ प्रा.डाॅ.बाबुराव गुरव (तासगांव,सांगली) यांना देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्याने पुरस्कार स्मृती मंडळाच्या क्रियाशिल सदस्यांच्या माध्यमातून सदर मान्यवरांच्या निवासस्थानी जावून प्रदान करण्यात आले. ‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्काराचे’ मानकरी जेष्ठ दुर्ग अभ्यासक आप्पा परब यांना स्मृती मंडळाचे सदस्य निलेश गावडे, रवि पवार, संतोषराजे गायकवाड, प्रविण मळेकर व रविराज फुगे यांनी त्यांचे निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार’ या वर्षी जेष्ठ अभ्यासक,विचारवंत,लेखक आणि व्याख्याते प्रा.डाॅ.बाबुराव गुरव यांना प्रदान करण्यात आला. या समयी स्मृती मंडळाचे संतोष घुले, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी तासगाव येथे त्यांचे निवासस्थानी जावून हा पुरस्कार दिला. या वेळी त्यांचे कुटुंबिय तसेच अमर खोत, फारूकभाई गवंडी, प्रा. वासुदेव गुरव मान्यवर उपस्थित होते.
संतोष घुले यांनी प्रास्ताविक केले तर एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी आभार मानले.