- भोसरीत स्वयंघोषित भाई अवतरला; परिसरात कोयत्याच्या आधारे दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी क्र. २ व ४ यांनी वाद उकरून काढला. त्याच दरम्यान आरोपी क्र. २ याने फोन करून आरोपी क्र. १ यास बोलवुन घेतले. आरोपी क्र. १ याच्या सोबत आरोपी क्र. ५ व ६ हे औरा गाडीतुन आले. आरोपी क्र. १ याने हातात कोयता घेवुन ‘तुम्ही आमच्या गॅगला दम देता का’? असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपी क्र. २ व ४ यांनी फिर्यादीला लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच लक्ष्मण आखाडे यास आरोपी क्र ५ व ६ यांनी पकडुन आरोपी क्र १ याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीच्या पाठीत व लक्ष्मण आखाडे याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच कोयता हवेत फिरवुन ‘मी आताच मोक्कामधुन बाहेर आलो असुन, आम्ही इथले भाई आहे’ अशी धमकी देवुन दशहत निर्माण केली. हा प्रकार (दि. १६) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमा. एस टीबी इंजिनिअरींग वर्क्स, देवकर वस्ती, दत्त मंदीराशेजारी, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला.
विशाल विठ्ठल साळवे (वय-१९ वर्षे) यांनी आरोपी १) ओकार मल्हारी दळवी (वय २२ वर्षे, रा. रानजत्रा हॉटेल जवळ, दिघी), २) योगेश जगन्नाथ मुळे (वय-२१ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), ३) गणेश कृष्णा गवारी (वय १९ वर्षे रा. दत्त मंदिरजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी), ४) विजय विरेंद्र चव्हाण (वय १८ वर्षे, रा. सदगुरुनगर, भोसरी), ५) तेजस डोंगरे (रा. भोसरी), ६) सचिन येरे (रा. भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसानी ३१८/२०२४ भा.दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४(२५), म पो का कलम ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी १ ते ४ अटक आहेत. पोउपनि केंद्रे पुढील तपास करीत आहेत.












