- एम्पायर इस्टेटजवळील घटना; डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- डंपरचालकाने (एम.एच १४/केक्यु- ५१००) त्याचे वाहन बेदरकारपणे, हयगयीने, अविचाराने चालवत समोरील डाव्या बाजुने २७ वर्षीय तरुणाच्या यामाहा एफ झेड या गाडीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. त्याच्या मत्युस आरोपी कारणीभुत ठरला आहे.
योगेश श्रीकांत संगनोर असं मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना (दि. १६) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास मदर टेरेसा ओव्हर ब्रिज खाली, शनि मंदिराजवळ, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी सोमेश रमेश मुंडकर (वय. २५ वर्षे) यांनी आरोपी दशरथ रमेश धोरलेकर (वय. ४० वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४६४/२०२४ भा.दं.वि. क २७९,३०४ (अ), मो. वा. का. क. १८४ प्रमाणे आरोपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश बोकेफोडे पोलीस उप निरीक्षक तपास करीत आहेत.











