न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- ४० फुट बाय २० फुट या जाहीरात फलकाचा व मजबुतीकरणाचा दाखला (स्ट्रक्चर स्टॅबिलीटी सर्टिफिकेट) याची मुदत संपली आहे. मुदतीत नुतनीकरण न करता व मानवीजिवीत व इतरांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे बेदरकारपणे व हयगयीने कृती करुन सदरचा जाहीरात फलक खाली कोसळला.
त्यामध्ये टेम्पो क्रमांक एम.एच.१४/एल.बी/९२१४ हिची पुढील काच फुटुन, वरील टप, बॉडी व चासी चेंबुन, तसेच टोयोटा ईटॉस कार नंबर एम.एच १२/आर.एन.४६४९ हिची पुढील काच फुटुन, वरील टप चेंबुन नुकसान होवुन, तापकीर यांचे पत्राशेडचे दुकानाचा पत्रा चेंबुन नुकसान झाले आहे. हा प्रकार
(दि. १६) रोजी दुपारी ४.३० वाचे सुमारास आनंद पब्लिसीटीचा जाहीरात फलक, सुर्यकांत तापकीर यांची जागा, स.नं. ४५२/१/११, तापकीनगर, सर्व्हिस रोड, मोशी येथे घडला.
फिर्यादी ग्यानचंद हरी भाट यांनी आरोपी १) आनंद रमणलाल गांधी (वय ३८ वर्ष रा. ६९/५४५, महर्षीनगर पुणे), स्ट्रक्चर डिझायनर २) हेमंत कुमार शिंदे (रा. कात्रज पुणे) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २५२/२०२४ भादवि कलम ३३६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संतोष हाके, पोहवा तपास करीत आहेत.















