न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे सर्वच कर्मचा-यांच्या मनात बोनस मिळेल की नाही, अशा शंका असताना पिंपरी-चिंचवड कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती आहे. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तरतूद केलेली आहे. तसेच दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना ८.३३ टके बोनस आणि १५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील आठवड्यात दिली जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्यासाठी ठेवी मोडण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेला चालू आर्थिक वर्षात १ हजार २८९ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. तसेच, प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करून ठेवलेली आहे. दिवाळी बोनसचा साडे सात हजार कर्मचारी व एक हजार शिक्षकांना लाभ होणार आहे. असे महापालिका महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.