न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफजल नूर मोहम्मद खान (वय ४४), इरफान शफीउद्दीन कालेमुंडासे (दोघे रा. फेमस चौक, नवी सांगवी), नसरुद्दीन शमशुद्दीन शेख (रा. औंध), युसूफ रहीम शेख उर्फ बाबा शेख (रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत विजय शेशमल पोरवाल (वय ६१, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावाने २० रुपयांच्या स्टॅप पेपर १९८९ साली बनावट ताबे साठेखत बनवले. त्यावर बनावट सह्या करून पोलिसांना व न्यायालयात सादर केले. खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जागेवर अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला.












