न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. सुप्रिया यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर करोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता उपचारानंतर ते करोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे.
















