न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२०) :- शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी (पिंपरी चिंचवड शहर) रावसाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे यांच्या हस्ते थोरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
मुंबईतील वडाळा येथील महाराष्ट्र वितरक सेनेच्या राज्यस्तरीय कार्यालयात हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वितरक सेनेचे सरचिटणीस दिलीप ब्राम्हणे, प्रितम उपलप, सारंग घाडगे, अरविंद नाईक, अमोल फरकळे आदी उपस्थित होते.
शिवसेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख नेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर व शिवसेना मावळ जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनावाखाली रावसाहेब थोरात यांच्यावर महाराष्ट्र वितरक सेनेच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.