- प्राधिकरण प्रशासनाने धामिर्क भावना भडकवू नयेत – विजय पाटील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- डिसेंबर २०१८ च्या अखेरीस बिजलीनगर व चिंचवडेनगर येथील गणेश मंदिर, तुळजाभवानी मंदिर तसेच साई मंदिर अश्या चार मंदिरांवर प्राधिकरण अतिक्रमण विभाग कारवाई करणार आहे. परंतु, सदरची कारवाई ही प्रशासन दुजाभाव करून करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अश्या पक्षपाती कारवाईमुळे हजारो हिंदू धर्मियांची मने दुखावली जाणार आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून या मंदिरांवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. प्राधिकरण हद्दीतील सेक्टर २९ ते ३३ अश्या पाच क्षेत्रामध्ये २४ अनधिकृत धार्मिक स्थळे सध्या अस्तित्वात आहेत. त्यामध्ये हिंदू मंदिरे, मज्जीद, बुद्ध विहार, चर्च अश्याप्रकारे सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे उभी आहेत. अश्याप्रकारे सर्व धर्मीय धार्मिक कार्यक्रम गुण्या गोविंदाने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी साजरे करीत आहेत.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील मत व्यक्त करताना म्हणाले की, चिंचवड परिसरातील रावेत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, गुरुद्वारा परिसरामध्ये ८०००० पेक्षा जास्त नागरिक शांतता व सौदार्याच्या वातावरणात सध्या राहत आहेत. ह्या २४ अनधिकृत धार्मिक स्थळांना प्राधिकरणाने ‘ब’ निष्काशीत श्रेणीत वर्गीलेले आहे. त्यापैकी २० धार्मिक स्थळांवर तूर्तास कारवाई टळली आहे.परंतु, बिजलीनगर – चिंचवडेनगर येथील हिंदू मंदिरांवर आता हातोडा पडणार आहे. सदरची मंदिरे १५ वर्षांपासून धार्मिक आस्थापणाची केंद्रे असून लोकांची आस्था या मंदिरांशी जोडलेली आहे. स्थानिक रहिवाशांनी या कारवाई विराधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुन्हा धार्मिक वातावरण ढवळून निघणार यात शंका नाही.
या निमित्ताने स्थानिक लोकप्रतिनिधीं, रहिवाशी यांची तुळजाभवानी मंदिरात नुकतीच बैठक झाली असून, स्थानिक नगरसेवकांवर कारवाई न होणेकरिता नागरिकांचा दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांचे म्हणने ही रास्तच आहे. शहरातील १२८ मंदिरांपैकी १२४ मंदिरे नियमित झालेली असून ह्या परिसरातील धार्मिक स्थळे नियमित का होत नाहीत? सदर मंदिराच्या जागा कुठल्याही प्रकल्पाच्या, किंवा आरक्षणाच्या नसून सर्व मंदिरे निवासी – रहिवाशी झोन मध्ये आहेत. तसेच बिजलीनगरमधील गणेश मंदिर तर सन २००३ पासून असल्याकारणाने सदरच्या मंदिरावर कारवाई नियमबाह्य ठरते. गणेश मंदिरामुळेच बिजलीनगर शिवनगरी परिसरास एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. अश्या मंदिरावर कारवाई होणे घटनांबाह्यच ठरत आहे.












