न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिल्यानंतरकामे करणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीस पन्नास हजार रुपयांचा दंड केला आहे. शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.
सिटी फायबर नेटवर्क फॉर कोअर, अॅग्रीशन अॅण्ड अॅक्सेस लेअर, वायफाय, सीसीटीव्ही पोल बसविण्याचे नियोजन आहे. या कामासाठी रस्ता व फुटपाथ खोदाई करावी लागणार होती. कोअर आणि अॅग्रीशनसाठी करण्यात येणाऱ्या रस्ता खोदाईस पावसाळ्यातही परवानगी दिली आहे. काम अत्यावश्यक असल्याने आणि रस्ता व फुटपाथ खोदाई केल्यानंतर फुटपाथ पूर्ववत कामे करण्याचे नियम घालून दिले आहेत.
सुरक्षतेच्या दृष्टीने फलक लावणे आदी खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे उल्लंघन केल्याने पन्नास हजारांचा दंड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी केला आहे. पोल स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना पावसाळ्यात परवानगी देण्यात आली होती. परंतु, ठरवून दिलेल्या नियमांचे आणि पालन करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित कंपनीस ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.