न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ८ डिसें ) :- १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून सर्व जगभर व भारतात साजरा केला जातो. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नई दिल्ली) या संघटनेच्यावतीने शुक्रवार (दि. ७) रोजी पुणे शहर वाहतुक शाखेच्या डीसीपी. तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. वाहतूक पोलीस व संघटनेमार्फत जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त पुणे शहर व परिसरात वाहतूक सुरक्षा जनजागृती व्हावी, यासाठी सुरक्षा संदेश देणारे फलक लावण्याकामी निवेदन दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (लिगल सेल) प्रशांत साळुंके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक पाटणे, सचिव अनिल पारवडे, माधवी जनार्धनन आदी पदाधिकारी ऊपस्थित होते .
वाहतूक अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुणे शहर वाहतुक शाखेमार्फत जी मदत लागेल ती मदत देण्याचे यावेळी आश्वासन दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कळसकर व पोलिस निरीक्षक मगर यांनी सुरक्षा फलक कुठे व कसे लावावे याबाबत मार्गदर्शन केले.












