- स्वी. नगरसेवक दिनेव यादव यांच्या पाठपुराव्यास यश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- स्वी. नगरसेवक दिनेव यादव यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. कुदळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विद्युत पोलवरील दिवे बंद व नादुरुस्त झाले होते. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्तीबाबत पाठपुरावा चालू होता.
आज शनिवार (दि. ८) रोजी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. भैरवनाथ मंदिर परिसर, भक्ती शक्ती नगर, यादवनगर येथील बंद पडलेले विद्युत पथदिवे दुरुस्ती व नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत.












