न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी महामार्गावर पार्क केलेली बस चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. अजमेर राजमहंमद पटेल यांनी याबाबत रविवारी (दि. २) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी खासगी बसचे चालक माहेत कांदी यांनी २९ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास जुना पुणे – मुंबई महामार्गावर पिंपरी येथील शेल पेट्रोल पंपावर बस लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आला.