न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) रोजी १०८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८९८६ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीतील चिंचवड (७५ वर्षे),आकुर्डी (४१ वर्षे), निगडी (६४ वर्षे)भोसरीतील ६६ वर्षे, अशा चार पुरुषांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर, हद्दीबाहेरील देहूगाव (५४ वर्षे), शिरूर (६४ वर्षे) अशा दोन पुरुषांचा मृत्यू झालेला आहे.
शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८६०३५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५५१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.


















