न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसें) :- नेहरू स्टेडियम येथे पुणे महानगरपालिका आयोजित महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात एस बी पाटिल कॉलेजची सुरभी शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकविला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, भाईजान काजी, गिरीष देसाई, प्राचार्या अनुजा कामठे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रिड़ा शिक्षक प्रदीप कासार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.












