- उणे २७ कोटींचा नफा पोहोचला ५३.१९ कोटींवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- रुपी को ऑपरेटीव्ह बँकेने गेल्या चार वर्षांत २५८.११ कोटी रुपयांची कर्ज वसुली केली असून, अजूनही २९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वाढलेली कर्जवसुली, दैनंदिन खर्चात केलेली कपात यामुळे उणे २७ कोटी असलेला नफा आता ५३.१९ कोटींवर गेला आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे फेब्रुवारी २०१३ मध्ये रुपी बँकेवर रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने (आरबीआय) निर्बंध घातले आहेत. रुपी बँकेची ५०७.०९ कोटींची कर्जे २०१६ मध्ये थकीत होती. त्यात २९७.१७ कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे.
रुपीची २०१६ ते २०२० याकालावधीत २०१७ मध्ये सर्वाधिक रुपयांची कर्जवसुली झाली. तर, ऑक्टोबर २०२० अखेरीस १.८२ कोटी रुपयांची कर्जवसुली होऊ शकली आहे. कोरोनामुळे वसुलीत खीळ बसली असल्याचे दिसून येत आहे. रुपीमध्ये पाच वर्षांपुर्वी ५४४ कर्मचारी होते. त्यात आता २७७ पर्यंत घट झाली आहे. वेतन आणि दैनंदिन खर्चात कपात करण्यात यश आल्याने परिचालनात्मक नफा वाढला आहे.
















