न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- लग्राचे आमिषाने बलात्कार करून महिलेला मारहाण करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. २०१८ ते २२ नोव्हेंबर २०२० या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश भाऊसाहेब ढोरमले (३०, रा. मोहननगर, चिंचवड) याला अटक केली आहे. ढोरमले याची फिर्यादी महिलेशी ओळख झाली. फिर्यादीचा पती दारू पिवून त्रास देत असल्याने मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. गर्भपात केला नाही तर, तुझ्याशी लग्न करणार नाही, अशी भीती दाखवून गर्भपात करण्यास भाग पाडले. लग्नाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली.
















