न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- चाकण औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधून अकरा लाख ३३ हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चाकण एमआयडीसीतील भांबोली गाव हद्दीतील गट क्रमांक २८० मधील बीटीएस वॉक्सचे लॉक तोडून इरेक्सन कंपनीचे दोन लाख रुपये किंमतीचे बीटीएस रुस कार्ड चोरट्याने नेले. संजय चंद्रभूषण पाठक (वय ४२, रा. दिघी रस्ता, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण आहे.
निघोजे येथील बोपदेव मंदिरा पाठिमागील अयाती इनोव्हेटिव्ह कंपनीतून कॉपर केबल, ग्राईंडर, वेल्डींग मशिन, आर्थिग कॉपर केबल व इलेक्ट्रिक लॅम्प केबल असा किमती ऐवज चोरुन नेला. प्रदीप बाबासाहेब गुंजाळ (वय २६, रा. डूडुळगाव, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.