- मराठी साहित्यातील एका नामवंत सुप्रसिध्द लेखकाला शासनाच्या मदतीची आवश्यकता
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसें.) :- ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडु तुपे यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात साहित्य रसिकांना आपल्या साहित्याच्या जोरावर मंत्रमुग्ध केले होते. आज मराठी साहित्यातील एक नामवंत सुप्रसिध्द लेखक आपल्या अंतिम क्षणी कठीण काळातून जात आहे. यासाठी शासनाने त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे येवून, जमेत तेवढी मदत करावी, असे आवाहन शिवसेना तिरोडा विधासभेचे संपर्कप्रमुख व शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी केले आहे.
कोणतेही साहित्यीक, कलावंत हे खऱ्या अर्थाने समाजाची वैचारिक संपत्ती असते. या संपत्तीचे रक्षण करणे हे शासनाचे, समाजाचे आद्यकर्तव्य आहे. आपला सांस्कृतिक वारसा जतन करून, येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी, समाजाला एक विशिष्ट दिशा दाखवण्याचे काम लेखक करीत असतात.
लेखक उत्तम तुपे हे सध्या आजारी असतात. तसेच त्यांच्या पत्नीही आजारी असतात. दोघेही फार थकलेले आहेत. खऱ्या अर्थाने भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने त्यांच्या साहित्यीक योगदानाची दखल घेवुन, त्यांना पद्मश्री पुरुस्काराने सन्मानीत करायला हवं होतं.












