न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसें.) :- नगरसेवक विकास डोळस यांनी सोमवार (दि. १०) रोजी दिघी, बोपखेल परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विस्कळीत पाणी पुरवठा होत असलेल्या भागात समक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे उपस्थित होते.
विस्कळीत पाणीपुरवठ्याची गंभीर बाब नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या दिड महिन्यांपासून दिघी, बोपखेल परिसरात होत असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याचा महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या इतर भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना दिघी परिसरात वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, प्रशासनाने याची गंभीर दाखल घेत हा प्रश्न तडीस लावण्याची मागणी डोळस यांनी केली आहे.












