- शहरातील २२३ जणांना कोरोनाची बाधा; ३९३ रुग्णांना डिस्चार्ज तर, ९ रुग्णांचा मृत्यू …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २ डिसेंबर) रोजी २२३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२७७४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८९७२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६४२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले २ पुरुष रुग्ण हे चिंचवड (७९ वर्षे), पिंपरी (३५ वर्षे), तर, ०२ स्त्रीया या चिखली (७४ वर्षे), थेरगाव (८२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात यापूर्वी मृत झालेले तीन पुरुष रुग्ण हे खेड (८० वर्षे), सोलापूर (८० वर्षे), देहूगाव (६८ वर्षे) तर दोन स्त्रिया या जुन्नर (६५ वर्षे), देहूरोड (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.