- पोलीस आयुक्तांकडून सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर पिंपरी – चिंचवड शहर दलातील सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालयांतर्गत झालेल्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी दिले.
सहायक निरीक्षक तसेच सहायक उपनिरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती केली होती. मात्र, त्यातील काही अधिकाऱ्यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे.
विविध पोलीस ठाण्यामध्ये तपास पथकात असलेल्या अधिकाऱ्याच्या वाहतूक विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या तपास पथकामध्ये नियुक्त झालेल्या नवीन अधिकाऱ्यांना खबऱ्यांचे जाळे तयार करण्याचे आव्हान राहणार आहे.