न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ११ डिसें.) :- पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. चिखलीतील कुदळवाडीतही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. त्यानुसार स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी मनपा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मोकाट कुत्री पकडण्याची मागणी केली. आज मंगळवार (दि. ११) रोजी मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील मोकाट कुत्री पकडून त्यांची रवानगी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागात केली आहे.












