न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ११ डिसें.) :- काळेवाडीतील मच्छिंद्रतात्या तापकीर सोशल फाउंडेशनच्या वतीने कै. लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिम्मित गुरुवार (दि. १३) रोजी तापकीरनगर येथे सायंकाळी ६ वाजता ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या सुश्राव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कीर्तन साथ पंचक्रोशीतील गायक, वादक व वारकरी मंडळी करणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन हभप. रामकृष्ण गरड व हभप. मानकर स्वामी महाराज करणार आहेत. कार्यक्रम प्रसंगी हरिपाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या कीर्तन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक मा. विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, मा. नगरसेविका अनिता तापकीर युवा नेते सागर तापकीर यांनी केले आहे.












