न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- महावितरणचे कर्मचारी त्यांचे काम करत असताना त्यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला, याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी साडेसहा वाजता धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.
स्वप्नील जाधव (वय ३०, रा. कोंडीबा लांडगे मार्ग, धावडे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत महावितरणचे गणपत वसंत केवाळे (वय ५०, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे महावितरण मध्ये कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी फिर्यादी आणि त्यांचे सहकारी धावडे वस्ती, भोसरी येथील कोंडीबा लांडगे मार्गावर महावितरणचे काम करत होते. त्यावेळी आरोपी स्वप्नील जाधव तिथे आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकार कामात अडथळा निर्माण केला.
















