न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- सेक्स रॅकेटचालवणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारून तीन महिलांची सुटका केली. तसेच एकाला अटक केली. थरमॅक्स चौक येथे शनिवारी (दि. १२) निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. तानाजी ऊर्फ राजेश व्यंकट कानुरे (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी कानुरे याच्यासह विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तानाजी हा थरमॅक्स चौकात ऑन टाइम ब्युटी अँड स्पा नावाचे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून खात्री करून स्पा सेंटरवरछापा मारला.
स्पा सेंटरमधून ३१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, केरवा माकणे, मछिंद्र घनवट, पोलीस कर्मचारी सतीश ढोले, परवीन पठाण, विनोद व्हनमाने, दीपक जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.