- शहरातील नागरिकांनाही सावधानता पाळण्यासाठी पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- भोसरी येथील एका आठवीत शिकणाऱ्या मुलीला झुम अॅपवर अश्लील मेसेज आले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीने आत्महत्या करावी अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून हा प्रकार वारंवार होत असल्याने याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-४२) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलीसंबंधी तिचे वडील आणि मुख्याध्यापकांच्या मेलवर देखील अश्लील मेसेज आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हा गंभीर प्रकार १५ जून ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत घडला आहे. आरोपीने माझा माणूस तुझ्याकडे पाठवतो, तू जर आली नाहीस तर जीवे मारेल, अन्यथा तू आत्महत्या कर असे झूम अॅपवर मेसेज आरोपीने पीडित मुलीला केले आहेत.