न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२०) :- शीतपेयातून गुंगीचे औषध मिसळून एका जीम ट्रेनरने सहकारी तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खराडीत घडली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी पुणे फिटनेस फ्रिक जीममध्ये घडली आहे.
याप्रकरणी दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील फिटनेस फ्रिक जीममध्ये दीपक चौगुले आणि एक तरूणी ट्रेनर आहेत. तीन दिवसांपूर्वी दीपकने तक्रारदार तरूणीला फेसबुक कॉल करून भूक लागली आहे, असे सांगत जीममध्ये डबा घेऊन बोलाविले.त्यानंतर दीपकने फ्रुटीमध्ये गुंगीचे औषध मिसळून तरूणीला प्यायला दिले. काही वेळानंतर तरूणीला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दीपकने तरूणीला शरीर संबंधाचा व्हिडिओ असल्याचे सांगून धमकी दिली. त्याशिवाय घटनेबाबत कोणाला काही बोलल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
जीममध्ये असलेल्या ट्रेनरने महिला तरूणीवर बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.
– किरण औटे, पोलीस उपनिरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे


















