- शहरात आज १२७ जणांना कोरोनाची बाधा; १२९ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २२ डिसेंबर) रोजी १२७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५५६३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२०८३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७३४ जणांचा मृत्यू झालेला आहे.