न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २३ डिसेंबर) रोजी १३९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष -चिंचवड (६२ वर्षे, ७३ वर्षे), पिंपळे गुरव (७५ वर्षे), ०१ स्त्री- भोसरी (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – पुणे (७५ वर्षे), २ स्त्री राजगुरुनगर (७८ वर्षे), दौड (७९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५७०२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२२९३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७४१ जणांचा मृत्यू झालेला आहे.














