- टेल्को रोडवरील घटना; आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका तरुणाच्या गळ्यावर कटरने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास टेल्को रोड येथे घडली. अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (२६, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपपट्टी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याबाबत शुभम मधुकर कांबळे (२०, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी शनिवारी (दि. २) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण शिवाजी थोरात (२३, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे चालले होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेकच्या गळ्यावर कटरने वार केला. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून किरण याला अटक केली.
















