न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ डिसें.) :- वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना मोफत भोजन देणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड स्टेशन येथे शनिवार (दि. १५) रोजी दुपारी ३. वाजता उदघाटन होणार असल्याची माहिती, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल यांनी दिली आहे.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यावेळी दानशूर व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. अगरवाल समाजातील काही कार्यकर्ते एकत्र येवून १० ऑक्टोबर १८ पासून महाराजा अग्रसेन जयंतीदिनापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णाना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एम. ए. हुसैन यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. या योनेचा आजतागायत ४ हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. भविष्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सीए बंसल यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल, खजिनदार संजीव आगरवाल यांनी पुढाकार घेतला घेतला आहे.












