न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १३ डिसें.) :- कुणाल आयकॉन रस्त्यावरील तीन हॉटेलला मोठी आग लागली आहे. रोझ आयकॉन जवळील ज्येष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे शेजारील आणखी दोन हॉटेलला त्या आगीची झोप पोहचली. त्यामुळे बघता बघता तीनही हॉटेलला आगीने वेढले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून, आग विझविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.परिसरात बघ्यांची गर्दी झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आग विझविण्याचे काम सुरूच आहे.












