- शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासावर अधिकाऱ्यांशी चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरामध्ये एकूण लोकसंख्या सुमोर २५ लाख असून शहरामध्ये एकूण ७२ झोपडपटटया असल्याने सामान्य गोरगरीब मजूर लोकांची मुले महानगरपालिका शाळेत शिक्षण घेत असतात. तसेच गरीब गरजू विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणेसाठी ग्रामप्रबोधिनी या संस्थेचे भताणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांशी चर्चा केली.
या चर्चेमध्ये महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा व विद्यार्थ्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चामध्ये विद्यार्थ्यांचा कश्याप्रकारे सर्वांगीण विकास करता येईल याबाबत भताणे यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व कलेनुसार कशा प्रकारे नियोजन करता येईल याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या गृहभेटीव्दारे विद्यार्थ्यांची सर्वांगीण माहिती घेवून त्यानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यापुर्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले.
चर्चेमध्ये उपमहापौर केशव घोळवे, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, पर्यवेक्षक खान, जोशी, शिंदे, कांगुडे, लांघी व लेंभे यां सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.