- अन्यथा उद्घाटन होऊ देणार नाही; शहर मनसेचा आक्रमक पवित्रा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. दापोडी ते पिंपरी या दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टिने मेट्रो लाईन १ ही निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत होणे आवश्यक आहे. मात्र मंजुरीसाठी पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्पाचा अहवाल केंद्र शासनाच्या दरबारी पडून आहे. त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करून प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा. त्यानंतरच उदघाटनाचा घाट घालावा, निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच मोठ्या दिमाखात उदघाटन करावे अन्यथा या प्रकल्पाला मनसेचा विरोध राहील, अशी भूमिका शहर मनसेने घेतली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पालिकेने पुढाकाराने पिंपरी ते निगडी या प्रकल्प अहवालास मार्च २०१९ रोजी मान्यता शासनाकडून मान्यता मिळाली. प्रकल्प अहवाल राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. परंतु, अद्यापही यावर काही अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे निगडीवासियांच्या मनामध्ये मोठे नैराश्याचे वातावरण आहे.
निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प व्हावा यासाठी विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे. पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या दारी पडलेला आहे, लवकरात लवकर मंजूर करावा, नंतरच उदघाटनाच घाट घालावा. निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आपण मोठ्या दिमाखात उदघाटन करावे. निगडीपर्यंत मंजुरी न मिळता आपण उदघाटन केलेच तर उदघाटनाला आमचा विरोध राहील,. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे उदघाटन होऊन देणार नाही, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.