न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०८ जानेवारी) रोजी १५१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे १६१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली एक स्त्री रुग्ण ही जाधववाडी (४६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७६२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४१५८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७६८ जणांचा मृत्यू झालेला आहे.