न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०९ जानेवारी) रोजी १६७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष- पिंपळे गुरव (६५ वर्षे), भोसरी (६८ वर्षे), नेहरुनगर (६९ वर्षे), ०१ स्त्री – दापोडी (५३ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – जुन्नर (६७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७७९० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४३१६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७७२ जणांचा मृत्यू झालेला आहे.