पिंपरी (दि. १३ डिसें.) :- महापौर राहुल जाधव यांनी प्रभाग क्र. १० मोरवाडीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. यात परिसरातील आनंदधाम स्मशानभूमी व दफनभूमीतील कामांचा आढावा घेतला आहे.
यावेळी अ प्रभाग अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेवक तुषार हिंगे, अ क्षेत्रीय अधिकारी आशा दुर्गुडे, कार्यकारी अभियंता सुपेकर, स्थापत्यचे प्रताप मोरे आदी उपस्थित होते.
अक्षरधाम स्मशानभूमीच्या जवळ असणारी स्मशानभूमीस सर्व-धर्मीय स्मशानभूमी असे नाव देण्यात यावे, स्मशानभूमीतील काही किरकोळ कामे लवकर पूर्ण करावेत, स्मशानभूमीची सुसज्जता, स्मशानभूमीचा नूतनीकरण आराखडा, तसेच याठिकाणी असणारे नळ व स्वच्छता राखावी, याबाबत महापौर राहुल जाधव यांनी सबंधीताना सूचना केलेल्या आहेत.












