न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसें.) :- पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते.
पवनाथडी जत्रे मध्ये महिला बचतगटांना वस्तू विक्रीकरिता स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. स्टॉलसाठी शनिवार दि. १५ ते सोमवार दि. २४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात विहित नमुन्यातील अर्ज भरावे लागणार आहेत. दिलेल्या मुदतीत बचत गटांनी अर्ज करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.












