न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांचे पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर,ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.