- नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- देहूच्या नगरपंचायतीचे सदस्य संख्या १७ निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांमधिल संभ्रम दूर झाला असुन इच्छुक उमेदवार वार्डची चाचपणी करु लागले आहेत. आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून वार्ड रचना करण्यासंदर्भामध्ये कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे.
नव्या नगरपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा राखीव असून दोन महिला व एक पुरुष अशा या जागा असतील. अनुसूचित जमाती साठी एक जागा राखीव आहे ही जागा पुरुष किंवा महिलेसाठी जाऊ शकते.
नागरीकांचा इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी पाच जागा राखीव आहेत. यामध्ये तीन महिला व दोन पुरुष असणार आहेत. उर्वरित आठ जागा ह्या सर्वसाधारण असणार आहेत. यामध्ये चार जागा पुरुष व चार जागा महिलांसाठी असणार आहेत, असे ८ जानेवारीच्या शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.