न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसें:) :- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिं. चिं. शहर यांच्या वतीने लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची ६९ वी जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, शारदा मुंडे, दत्तात्रय धोंडगे, अण्णा जोगदंड, सूर्यकांत कुरुलकर, बळीराम माळी, अदिती निकम, रामेश्वर गटकळ, राजाराम कोकणे, प्रकाश देशमुख, रविंद्र धुमाळ, दिनेश पवार, दिगंबर सुरवसे, शंकर तांबे, वामन भरगंडे, कृष्णाजी खडसे, राजेश गाटे, मुकुंदा कोळी, दिनेश गाडेकर, शिवराज गुंम्मे, अजीज सिद्धीकी, विजय देवकर, युवराज नलावडे, गोटके डी.एल., बाळासाहेब चितळकर, अभिमन्यु गाडेकर, मधुकर चौधरी, श्याम देशपांडे, सुनील शिंदे, सुरेशराव दिघे, सुभाषराव भापकर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने,
संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अरुण पवार म्हणाले, की मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ होते आणि खऱ्या अर्थाने ते एक जाणता नेता होते. म्हणूनच, त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती, असा नेता कधीही होणार नाही. मुंडे हे एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणारे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून बैठका जिंकणारे नेते नव्हते. तर गावागावांमध्ये जाऊन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा सामना करणारे नेते होते. लोकांमध्ये जाऊन मिसळणारे, त्यांना थेट भिडणारे नेते होते. मुंडे कार्यकर्त्यांसाठी भांडायचे. कार्यकर्त्याला न्याय मिळावा, म्हणून ते कोणत्याही टोकाला जायचे. अनेकदा अनेक नेते स्वार्थापोटी किंवा तडजोडीसाठी कार्यकर्त्याचा बळी देतात. मात्र, मुंडे कार्यकर्त्यासाठी काहीही करायला तयार असायचे. म्हणूनच मुंडे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत होते, असेही ते म्हणाले.
दत्तात्रय धोंडगे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.












